ग्रामपंचायत सेवा
जन्म दाखला हा कोणत्याही व्यक्तीचा सर्वात महत्त्वाचा आणि पहिला कायदेशीर पुरावा असतो.भारताच्या जन्म आणि मूत्यू नोंदणी अधिनियम, १९६९ नुसार प्रत्येक जन्माची नोंद ग्रामपंचायत कार्यालयात करणे बंधनकारक आहे.
जन्म दाखल्याचे फायदे आणि उपयोग -
१ ) शाळेत किंवा महाविद्यालयात प्रवेश घेण्यासाठी
२) आधार कार्ड (Adhar Card) पँन कार्ड काढण्यासाठी
३) पासपोर्ट आणि मतदान ओळखपत्र काढण्यासाठी
४) शासकीय योजनांचा लाभ मिळवण्यासाठी
नोंदणीचे नियम आणि मुदत -
१) २१ दिवसांच्या आत बाळ जन्माला आल्यापासून २१ दिवसांच्या आत ग्रामपंचायतीमध्ये जन्म नोंदणी करणे पूर्णपणे मोफत आणि बंधनकारक आहे.
२) २१ ते ३० दिवस २१ दिवसानंतर आणि १ महिन्याच्या आत नोंदणी केल्यास विलंब शुल्क भरावे लागते
३) १ वर्षानंतर १ वर्षानंतर नोंदणी करायची असल्यास तहसीलदार किंवा दंडाधिकारी यांच्या आदेशाशिवाय नोंदणी होत नाही.
आवश्यक कागदपत्रे
१) विहित नमुन्यातील अर्ज
२) आई वडिलांचे आधार कार्ड
३) रहिवासी पुरावा
आँनलाईन अर्ज आणि दाखला मिळवा
जन्म दाखल्यासाठी तुम्ही घरबसल्या आँनलाईन अर्ज करू शकता. खालील लिंकवर क्लिक करून आपला अर्ज करू शकता.
येथे क्लिक करा आणि जन्म दाखल्यासाठी आँनलाईन अर्ज करा
crsorgi.gov.in