सत्यमेव जयते

ग्रामपंचायत शिरसमणी, नाशिक

ग्रामपंचायत शिक्का

भारतातील पंचायती राज – ग्रामीण स्वराज्याची मजबूत पायाभरणी

जन्म, मृत्यू व विवाह यांची नोंदणी अवश्य करा. नागरिक सेवा, कर भरणा, योजना आणि अधिक – सर्व माहिती येथे.

NEW कोणत्याही दाखला/अर्जासाठी कार्यालयात येण्याची गरज नाही – येथे क्लिक करा व अर्ज करा   •   सूचना कर भरणा वेळेवर करा व आपल्या ग्रामपंचायतीला सहकार्य करा   •   NEW कोणत्याही दाखला/अर्जासाठी कार्यालयात येण्याची गरज नाही – येथे क्लिक करा व अर्ज करा   •   सूचना कर भरणा वेळेवर करा व आपल्या ग्रामपंचायतीला सहकार्य करा

ग्रामपंचायत विषयी

शिरसमणी

शिरसमणी

शिरसमणी ही ग्रामपंचायत नाशिक जिल्ह्यातील कळवण पंचायत समिती अंतर्गत येते. हे आदिवासी क्षेत्र असून गावकऱ्यांचा मुख्य व्यवसाय शेती आहे. ग्रामपंचायतीत विविध विकासात्मक उपक्रम सातत्याने राबविले जातात. ग्रामसभेचे आयोजन नियमित केले जाते व ग्रामस्थांचा सहभाग सक्रिय असतो. जलजीवन मिशन, स्वच्छ भारत अभियान, जलसंधारण व वृक्षलागवड यांसारखे उपक्रम प्राधान्याने राबवले जातात. शासकीय योजनांचा लाभ प्रभावीपणे पोहोचावा यासाठी ई-गव्हर्नन्स, ऑनलाइन दाखले व तक्रार नोंदणी सुविधा उपलब्ध आहेत. रस्ते, पाणीपुरवठा, स्ट्रीटलाईट, शाळा-अंगणवाडी सुधारणा तसेच महिला स्वयं-सहाय्यता गट व युवकांच्या कौशल्यविकासाला विशेष प्रोत्साहन दिले जाते.शिरसमणी गावाची माहिती:-
शिरसमणी हे नाशिक जिल्ह्याच्या कळवण तालुक्यात असेलेले एक प्रगतशील गाव आहे. हे गाव मार्कंडेय नदिवर वसलेले आहे. सन २०११ च्या जनगणनेनुसार लोकसंख्या सुमारे २३७९ आहे. तर कुटुंब संख्या ५०३ इतकी आहे. मुख्य गावामध्ये सावळदर, महादेव वस्ती , आवळे वस्ती अश्या छोट्या वस्त्यांनी तयार झालेले आहे. गावामध्ये जिल्हा परीषद प्राथमिक शाळा २ ,अंगणवाडी केंद्र ३ , आरोग्य उपकेंद १, तलाठी सजा १, सब पोस्ट ऑफिस १, सहकार सोसायटी १ असे शैक्षणिक, आरोग्य, सामाजिक सेवा सुविधा उपलब्ध आहेत.

गावाचे भौगोलिक स्थान –
शिरसमणी हे महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यातील कळवण तालुक्यापासून सुमारे ५ किलोमीटर अंतरावर आहे. हे गाव जिल्हामुख्यालय नाशिक पासुन उत्तरेकडे ७७ किलोमीटर अंतरावर आहे. शिरसमणी गावाचे क्षेत्रफळ सुमारे ६0७.६८ हे. इतके आहे. शिरसमणी गावालगत पुर्वेस भुसणी पश्चिमेस साकोरे दक्षिणेस कुंडाणे (ओ) व ओतूर व उत्तरेला जीरवाडे (ओ) व मानूर या गावांच्या सीमा आहेत.
गावाचा इतिहास –
आपला भारत देश हा खेडयाचा देश आहे. अजुनही 50% पेक्षा अधिक जनता खेडयात राहते. असेच एक खेडेगाव सहयाद्रिच्‍या पर्वतरांगेत असलेल्‍या संप्‍तश्रृगी गडाच्‍या पायथ्‍याशी बसलेले आमचे शिरसमणी गाव आहे. गावाला इंग्रजकाळातील इतिहास लाभलेला आहे. पूर्वजांच्‍या म्‍हणण्‍यानुसार हे गाव इंग्रज राजवटीत एक संस्‍थान होते. गावाला नाव हे ए‍का ऋषींच्‍या नावावरुन पडलेले आहे. फार वर्षापूर्वी या गावात ‘शिरस’ नावाचे ऋर्षी वास्‍तव्‍य करीत होते. त्‍यांच्‍याकडे एक अनमोल असा ‘मणी’ होता. गावात त्‍यावेळेस भयंकर रोगाची साथ पसरली होती. त्‍या साथीमध्‍ये खूपच मनुष्‍यहानी झाली होती. त्‍यावेळी गावक-यांनी ऋषीकडे धाव घेतली. त्‍यावेळी त्‍यानी त्‍यांच्‍याजवळ असलेला ‘मणी’ काहितरी मंत्र म्‍हणून वणीच्‍या सप्‍तश्रृंगी देवीला वाहायला सांगीतला. आणि त्‍या ऋषींच्‍या म्‍हणण्‍यानुसार गावक-यांनी तो ‘मणी’ देवीला अर्पण केला . आई भगवती प्रसन्‍न झाली आणि गावातील रोग आटोक्‍यात आला. शिरस ऋषींच्‍या मणीमुळे गावात पूर्वीचे वैभव नांदू लागले. तेव्‍हापासून गावाचे नाव ‘शिरसमणी’ असे पडले.
लोकजीवन –
शिरसमणी गावात सर्व जाती धर्माचे लोक रहिवास करतात. गावाचे लोकजीवन अगदी साधे व पारंपरीक आहे शेती हा येथीळ मुख्य व्यवसाय असून कांदा, टोमाटो मका व हंगामी भाजीपाला पिके मोठ्या प्रमानात घेतले जाते.शेतीसह काही लोक दुग्धव्यवसाय शेळीपालन, कुक्कुटपालन व लघुउद्योग असे पूरक व्यवसाय केले जातात. गावात विविध सामाजिक सांस्कृतिक व धार्मिक परंपरा जोपासल्या जातात. वर्ष भरात होणारे सन उत्सव दिंडी व अखंड हरीनाम सप्ताह गावाच्या एकतेचे दर्शन घडवतो. गावात असलेले पुरातन कालीन शिव जोतीत्लिंग श्री काशीविश्वर महादेवाचे जागृत ददेव्श्तन असल्याने दरवर्षी महाशिव्रती व श्रावण मास महिन्यात भाविकांची मोठ्या प्रमाणात दर्शनासाठी गर्दी असते. दरवर्षी महाशिवरात्री निमित्त ३ दिवस मोठी यात्रा भरवली जाते. शिरसमणी गावात आदिवासी लोक वस्ती मोठ्या प्रमाणत असल्याने गावात आदिवासी समाजाच्या धार्मिक डोंगऱ्या देव उत्सव साजरा केला जातो.

नवीन कार्यक्रम/योजना

घरकुल गृहप्रवेश

26 Jan 2026 शिरसमणी
घरकुलांचा गृहप्रवेश ग्रामपंचायत शिरसमणी

श्रमदानातून रस्ता तयार करणे

शिरसमणी

एकल महिला सन्मान

शिरसमणी

अभ्यासिका तयार करणे

शिरसमणी

प्रशासकीय रचना

मा. श्री. ओमकार पवार (भा. प्र. से.)

मा. श्री. ओमकार पवार (भा. प्र. से.)

मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद नाशिक

मा. डॉ. श्री अर्जुन गुंडे

मा. डॉ. श्री अर्जुन गुंडे

अति. मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद नाशिक

मा. श्रीमती प्रतिभा संगमनेरे

मा. श्रीमती प्रतिभा संगमनेरे

प्रकल्प संचालक, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा नाशिक

मा. डॉ. श्रीमती वर्षा फडोळ

मा. डॉ. श्रीमती वर्षा फडोळ

उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रा पं)

श्री. रमेश ओंकार वाघ

श्री. रमेश ओंकार वाघ

गटविकास अधिकारी, पंचायत समिती कळवण

श्रीमती वंदना दशरत सोनवणे

श्रीमती वंदना दशरत सोनवणे

मा. सहाय्यक गट विकास अधिकारी कळवण

श्री. युवराज सयाजी सोनवणे

श्री. युवराज सयाजी सोनवणे

विस्तार अधिकारी ग्रामपंचायत विभाग कळवण

श्री. प्रकाश तुळशिराम पवार

श्री. प्रकाश तुळशिराम पवार

ग्रामपंचायत अधिकारी

श्री. कैलास मुरलीधर जाधव

श्री. कैलास मुरलीधर जाधव

ग्रामपंचायत शिपाई

श्री. श्याम आण्णा भंडवे

श्री. श्याम आण्णा भंडवे

ग्रामपंचायत पाणीपुरवठा कर्मचारी

श्री.दिनकर मुरलीधर जाधव

श्री.दिनकर मुरलीधर जाधव

ग्राम रोजगार सेवक

पदाधिकारी

Madhuri Shivaji Shirsath
संगणक परिचालक

Madhuri Shivaji Shirsath


भारतातील पंचायती राज – ग्रामीण स्थानिक स्वराज्य प्रणालीचे प्रतीक

जन्म, मृत्यू व विवाह यांची नोंदणी अवश्य करा

📞 +91 9370130059

लोकसंख्या आकडेवारी वर्ष: 2025

कुटुंब503
लोकसंख्या2,379
पुरुष1,292
महिला1,087

व्हिडिओ