सत्यमेव जयते

ग्रामपंचायत शिरसमणी

← मुख्य पानावर जा

आदिवासी घरकुल योजना महाराष्ट्र 2026

शबरी आदिवासी घरकुल योजना महाराष्ट्र या आदिवासी उपयोजनेअंतर्गत आदिवासी क्षेत्रात असणाऱ्या जिल्ह्यातील अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांसाठी तसेच आदिवासी भव्य क्षेत्रात येणाऱ्या जिल्ह्यातील अनुसूचित जमातीच्या नागरिकांसाठी घराचे २६९ चौरस फूट क्षेत्र असलेले पक्के घरकुल उपलब्ध करून देण्याच्या उद्दिष्ट्याने अमलात आणली गेली आहे. या आदिवासी लाभार्थ्यांना स्वच्छ भारत मिशन अंतर्गत शौचालय बांधण्यात स्वतंत्र आर्थिक मदत देण्याची तरतूद देखील आहे. सन २०११ च्या सर्वेक्षणानुसार या योजनेसाठी आदिवासी समुदाय पात्र आहे आणि त्यांना लाभ दिला जातो. आदिवासी घरकुल योजनेसाठी लाभार्थ्यांची निवड करताना ग्रामसभा, पंचायत समिती, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा या ठिकाणी योग्य ती कार्यवाही करून मंजुरी देण्यात येते.

शबरी घरकुल योजना महाराष्ट्रात कुठे राबवली जाते?

Shabari Awas Yojana Maharashtra 2025 ही योजना महाराष्ट्र शासनाच्या आदिवासी विकास विभागामार्फत राबवली जाते. ही योजना मुख्यतः अनुसूचित जमाती बहुल जिल्ह्यांमध्ये लागू आहे, जिथे आदिवासी समाज मोठ्या प्रमाणात राहतो.

शबरी आवास योजनेचे उद्देश